शनिवार, २७ जुलै, २०१३

माहिती आषाढी एकादशीची .......

आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशी. सर्व एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्रात ठिकठिकाणाहून लाखो भाविक आणि वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत या दिवशी पंढरपूर विठ्ठल मंदिरात एकत्र येतात . पंढरपूरच्या वारीचा प्रत्येकाने एकदातरी आवर्जून अनुभव घ्यावा असा मला वाटतं. एक वेगळचं तेज आणि आनंद असतो त्या वातावरणात.

बुधवार, १७ जुलै, २०१३

नैसर्गिक प्रलय आणि त्यानंतर होऊन गेलेला एक महिना

केदारनाथ मध्ये झालेल्या प्रलयाला एक महिना कधी होऊन गेला कळलंच नाही, असं वाटतं कि आठवड्या पूर्वीचीच घटना आहे....ढगफुटी आणि पूर यामुळे आलेला प्रलय, आठवलं कि अजून शहारा येतो...एकेकाळचं गजबजलेलं मंदिर अचानक अगदी शांत झालं. टीवीवरचे परत परत तेच क्लिप्स बघून खूपच त्रास झाला. कितीतरी जण दगावले...अनेक बेपत्ता झाले....आणि  नंतर राहिलेल्या त्या एकेकाळच्या वैभवशाली परिसराकडे बघून वाटले कि निसर्गा पुढे आपण खूपच छोटे आहोत....

शनिवार, १३ जुलै, २०१३

जीवन असेही !!!! ............


आज मला काय लिहायचं हेच सुचत नाहीये..... मन शांतच होत नाहीये, अस्थिर वाटतंय ....अनेक विचार उगाच डोकावताहेत. तसं फार काही वेगळं नाही झालेलं ....आपण आजूबाजूला बरेच वेळा बघतो तेच आहे पण तरीही ते serious पणे विचार करण्यासारखं आहे. कारण आजच्या पिढीवर उद्याचं भवितव्य अवलंबून आहे.

शुक्रवार, १२ जुलै, २०१३

व्होट्स app......

भारतात android system चे फोन आल्यावर त्यांची लोकप्रियता वाढली आणि खरोखर android फोन ने मार्केट काबीज केले.  मला वाटत android फोन हे जवळ पास २०११ ते २०१२ पर्यंत सर्वा पर्यंत पोहोचले. ते स्वस्त होते आणि त्यांमध्ये smartphones ची features पण होती.अनेक फ्री apps हे या फोन्स चे विशेष. त्यापैकीच एक whats app हे आहे. whats app हे  अतिशय लोकप्रिय app आहे.

बुधवार, ३ जुलै, २०१३

दि सिक्रेट मूव्ही आणि त्यातल्या संकल्पना ......

लेखिका रहोंडा ब्यर्ने ( Rhonda Byrne ) यांचं " the secret " हे पुस्तक मी निदान तीन वेळा वाचलंय. मी जून २०१२ मध्ये हे पुस्तक खरेदी केलं होत. त्या आधी मी या पुस्तकाची मराठी अनुवादित आवृत्ती वाचली होती. या वर्षी फेब्रुवारीत एका सेमिनार मध्ये त्यांच्या या पुस्तकावरील मूव्ही बद्दल ऐकल आणि नंतर मूव्ही पाहिली सुद्धा.
खूपच छान आहे त्यातल्या संकल्पना . या पुस्तकामध्ये / मूव्ही मध्ये positive thinking (सकारात्मक विचार ) करण्यावर खूप भर दिलाय. आणि खरोखर संपूर्ण जीवन बदलू शकत आपण ते आचरणात आणला तर. बरीच पुस्तके आहेत उपलब्ध जी positive thinking, जीवनशैली बद्दल माहिती देतात पण शेवटी वाचलेलं आचरणात आणलं तरच खरा फरक पडतो. तर या मूव्ही मधले काही मुद्दे मी सारांश स्वरुपात नोट करते आहे ते म्हणजे -