रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

गणेश चतुर्थी ................

ढोल ताश्यांसाहित बाप्पाचे आगमन आज संध्याकाळ पासून ह्यायला सुरुवात झाली आहे. घरातील गणपती यायला देखील सुरुवात झाली आहे. झांज वाजवीत, "गणपती बाप्पा मोरया,मंगलमुर्ती मोरया" चा गजर करत बाप्पाचे आगमन होत आहे. खूप प्रसन्न वातावरण आहे. काही गणपतींचे आगमन कारमधून, काहींचे रिक्षामधून  काहींचे टेम्पोमधून तर काहींचे हातात धरून मिरवणूक काढत ........ पण सर्वांचा भक्तीभाव एकच.
(Image Source : my Photography Blog)

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३

मी पाहिलेली दहीहंडी तेंव्हा आणि आता ...............

लहानपणी मला दहीहंडी बघायची फार उत्सुकता असायची. आमच्या गल्लीमध्ये आमच्या बिल्डींगच्या जवळच दहीहंडी असायची. आम्ही मैत्रिणी बिल्डींगच्या गेट च्या आतून ती बघायचो.किती तरी वेळ उभं राहायचो दहीहंडी बघण्यासाठी, गाणी मोठ्याने लावलेली असायची तिथे आणि वाद्ये  पण वाजायची. आता पण हे सगळं होतं, पण ती मजा आणि ती उत्सुकताच निघून गेली आहे. नक्की कळत नाही कि सणांचे स्वरूप बदलते आहे कि आपल्यात बदल होतोय ......... आणि या मागे तशी ठोस कारणेही आहेत. 


(Image Source : my blog and link to images http://hobbyofphotography.blogspot.in/2013/08/dahihandi.html )

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१३

"तिने" केलेल्या उत्तम कामगिरीसाठी ........... उंच माझा झोका अवार्डचा कार्यक्रम

गेल्या रविवारी म्हणजे २५.०८.२०१३ ला झी मराठी वाहिनीवर  उंच माझा झोका अवार्डचा कार्यक्रम  लागला होता. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्या सर्व महिलांचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते आणि त्या सर्वजणींचा अभिमान वाटतो.