सोमवार, १७ जून, २०१३

जीवनाचा बहार ..... झाडांनी शिकवलेल्या गोष्टी...



दरवर्षी मी मे किंवा जुन महिन्यात आंब्याचं रोप न चुकता लावतेच. यंदा मी ११ मे ला आंब्याचे  चार बाटे (कोय) चार वेगळ्या disposable प्लास्टिक ग्लासेस मध्ये लावले होते. प्लास्टिक मध्ये अशासाठी कि झाड मोठ झालं कि  ते प्लास्टिक फाडून स्वतंत्रपणे झाडाच मुळ न दुखावता झाडांना मोकळ्या जागेत लावता येईल.रोज नियमितपणे त्यांना पाणी घातलं. १२ जून म्हणजे चार दिवसापूर्वी त्या चारपैकी एका बाटे तून कोंब आला आणि झपाट्याने वाढू लागलाय.

शुक्रवार, १४ जून, २०१३

मोबाईल फोन .....

मोबाईल फोन भारतात साधारण १९९६च्या दरम्यान आले. त्यावेळी कॉल रेट आणि मेसेज रेट खूपच जास्त होते. अर्थात मोबाईल हे त्यावेळी style statement होते. ठराविक लोकं सोडले तर बाकी सर्वांसाठी ते खूपच खर्चिक होते.

रविवार, ९ जून, २०१३

स्तुती .....

प्रत्येक माणसात एक लहान मूल असत जे कोणीतरी त्याच्या बद्दल काही चांगल बोलल, स्तुती केली तर आनंदून जाते. हे माझ्या friend ने बोलता बोलता अचानक केलेलं statement. तसं बघायला गेलं तर अगदी योग्य आहे.केलेल्या चांगल्या कामाची योग्य प्रमाणात दाद तर द्यायलाच पाहिजे.त्यामुळे खरच खूप आनंदी ह्यायला होतं आणि नव्याने काम करण्यास उत्साह मिळतो.पण स्तुती योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात असावी. मनापासून असावी. आता तर सरसकट मनात असो व नसो बोलण्यासाठी लोकं बोलतात अस वाटतं. पण त्यातही काही खास व्यक्ती ज्या मनापासून आपल्याला सांगतात ती गोष्ट आयुष्यभर पुरते. बऱ्याच वर्षानंतर कोणी आपल्या कामाची दाखल घेतली आणि बोलले तरी मन स्पर्शून जाते.

सोमवार, ३ जून, २०१३

फरक व्यक्त करण्यातला.....

दोन व्यक्ती एकाच घटनेचा वेगळ्या पद्धतीने विचार करतात. प्रत्येकाचा त्या घटनेकडे बघायचा दृष्टीकोन वेगळा असतो. म्हणूनच कदाचित म्हण आली असावी कि व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. शेवटी ती घटना किंवा भावना आपण कशी interpret केली आणि व्यक्तं केली यावर सगळा अवलंबून असत.