सोमवार, २९ डिसेंबर, २०१४

वडाले तलाव - पनवेल

पनवेल एस.टी स्थानकापासून १० मिनिटे अंतरावर वडाले तलाव आहे. जेंव्हा आम्ही पहिल्यांदा नवीन पनवेल वरून old पनवेलला bridge ओलांडून आलो तेंव्हा हे तलाव दिसले होते. तेंव्हाच ठरवलं होतं एकदा इथे परत यायचं.  नवीन पनवेलचा bridge ओलांडल्यावर सरळ जो रस्ता जातो तो थेट वडाले तलावाच्या दिशेने जातो. 
तलावाच्या भोवताली बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. कदाचित पावसाळ्यात तलाव पाण्याच्या पातळीमुळे अधिक चांगले दिसत असावे. तलावाच्या काठावर महादेव मंदिर आहे. तलाव स्वच्छ नसले तरी अगदी खराब देखील नाही. या तलावात छोट्या प्रमाणावर मासेमारी होते. वेगळ्या जातीचे पक्षी बघायला मिळाले. सोबत काही फोटो शेयर करीत आहे.


 तलावातील बदकं


कमळाची पाने

जाळ्यातील मासे बाहेर काढताना 





एकंदरीत पनवेल मध्ये राहत असणाऱ्यांसाठी वीकेंडला संध्यकाळी या तलावावर जाण्याचा  पर्याय चांगला आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा