रविवार, १२ मे, २०१३

अक्षय तृतीया ....


आज अक्षय तृतीया ...... सहसा माझा तिथींवर लक्ष्य जात नाही परंतु या तिथीवर लक्ष्य वेढला जाण्याचं कारण वेगळ आहे....ते म्हणजे पेपरात येणाऱ्या जाहिराती.......अगदी पेपर भरून जाहिराती.मग ते मराठी वृत्तपत्र असो किंवा इंग्रजी वृत्तपत्र अगदी मुखपृष्ठा पासून शेवटच्या पानापर्यंत एकतर दागिन्यांच्या किंवा जागांच्या जाहिराती किंवा घरगुती उपकरणांच्या...हल्ली कोणताही सण असो किंवा काहीही असो व्रुतपत्रात ६-७ दिवस आधीपासूनच जाहिराती यायला सुरु होतं.
असो......तर अक्षय तृतीयेला एवढे महत्व का? यावर मी google search केली. तर मला खालील माहिती 
मिळाली...
पौराणिक संदर्भ :
१.अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील तृतीयेला येणारी तिथी. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त.

२ अक्षय तृतीयेला महर्षी व्यास आणि देव गणपती यांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला .


३. युधिष्ठिराला श्रीकृष्णाने असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन वाया जात नाही. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे केले  जाते, ते सर्व अक्षय (‍कधीही न संपणारे ) होते.



४. भगवान परशुरामानंचा जन्म अक्षय तृतीयेला झाला आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष पूजा 

केली जाते.

५ .सत्य युग आणि त्रेता युगाची सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली. या दिवशी महाभारत युद्धाचा अंत झाला आणि द्वापार युगाचा अंत झला.

६. यादिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते.असा वाचनात आला कि या दिवशी कुबेर यादिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात.

या दिवसाचं महत्व :
- असा सांगितला आहे कि या दिवशी ज्या कामाचा आरंभ केला जातो ते सफल आणि अक्षय होते.
- दान केल,चांगला काम केला तर मिळणार पुण्य हे अक्षय (कधीही न संपणारे) असत.(पुराणात दान करण    सांगितला आहे त्यामागे कारण की वैशाख महिन्यात दुष्काळ असू शकतो.तर जांच्या कडे धान्य इत्यादी जास्त आहे त्यांनी  ज्यांच्या कडे नाही त्यांना मदत करावी.)
-या दिवशी शेतकरी पेरणीस प्रारंभ करतात.(यामागे कारण असा कि पावसाला लवकरच येणार असतो.)

search करते वेळी माझ्या वाचनात असा कुठेही नाही आला कि अक्षय तृतीयेचा आणि वस्तू (दागिने,घर इत्यादी )खरेदीचा काय संम्बंध आहे. अक्षय तृतीयेला दान करण किंवा चांगली कृत्य करण असा उल्लेख मला सापडला. कदाचित व्यापाऱ्यांचा interpretation चांगला असेल.त्यांना माहित आहे कि मार्केट कस कराव...

सारांश असा कि अक्षय तृतीयेला सुख व समृद्धी प्राप्त करून देणारी तिथी मानतात.आणि म्हणूनच शुभ कार्यांचा आरंभ या दिवशी केला जातो.

नोट: हा लेख अक्षय तृतीयेला (१2 मे  )लिहिला होता.पोस्ट करण्यास उशीर झला.