शुक्रवार, ३१ मे, २०१३

सर्कॅस

मी एक गोष्ट वाचली होती जवळपास सात महिन्यांपूर्वी .... गोष्टीचं नाव सर्कॅस. बरेच दिवस (महिने) लक्षात राहिली म्हणून ठरवलं कि पोस्ट करेन ब्लॉग वर. तर त्या गोष्टीत असा होतं कि...एका गावात एकेदिवशी सर्कॅस येणार अशी जाहिरात लागते. सर्व लोकं खूप excited  होतात. व प्रत्येक जण जायची प्लाननिंग करायला लागतो. ठरल्या प्रमाणे गावात सर्कॅस येते. आदल्या दिवशी मोठा तंबू उभारला जातो.
दिव्यांची रोषणाई केली जाते.दुसऱ्या दिवशी तिकीटासाठी पहाटे पासूनच गावकरी मोठी रांग लावतात. बराच वेळ झाल्यावर सर्कॅस चालू होते. एक विचित्र नियम असतो सर्कॅसमध्ये कि एका वेळेला फक्त एकाच माणसाला सोडण्यात येईल. पहिला माणूस आत जातो.गोल तंबू मध्ये पटांगणात मधोमध एक दिवा असतो आणि एक उंच माणूस येतो तो उंच माणूस या सर्कॅस बघायला आलेल्या माणसाला खूप फटके देतो आणि सोडून देतो. तो पहिला माणूस बाहेर येताना आपला अवतार ठीक करतो आणि बाहेर पडतो. साहजिकच बाहेर उभे असलेले इतर त्याला विचारतात कि सर्कॅस कशी होती. तो माणूस मनाशी विचार करतो कि मी सकाळ पासून इथे उभा आहे. एवढे पैसे आणि वेळ देखील खर्च केले आता सर्वांना सर्कॅसमध्ये काय झाला सांगितला तर गावकरी मूर्ख ठरवतील.तर तो सर्वांना सांगतो कि (हसरा चेहरा प्रयत्नशील पणे करून ) सर्कॅस खूप छान होती.अशी सर्कॅस मी कधीही पहिली नाही. हे ऐकल्यावर गावकऱ्यांची उत्कंठा अजून वाढते.
दुसरा माणूस आत जातो त्याच्या बरोबर पण तेच घडते. बाहेर पडताना तो विचार करतो कि पहिल्या माणसाला वेगळी सर्कॅस पाहायला मिळाली असेल कदाचित. त्याला सर्कॅस आवड्लीपण. मी जर खरं सांगितला तर ते योग्य होणार नाही. तर बाहेर आल्यावर सर्वांनी विचारल्यावर तो सांगतो (हसरा चेहरा प्रयत्नशील पणे करून ) कि “ अशी सर्कॅस मी माझ्या आयुष्यात कधी बघितली नव्हती आणि या पुढेही बघणार नाही. ” सर्व गावकरी आपल्या वेळेची आतुरतेने वाट बघायला लागतात.
एक एक करून सर्व गावकरी सर्कॅस मध्ये जातात आणि प्रत्येकाची तीच गत होते. पण बाहेर आल्यावर सर्व लोकं त्यांनी बघितलेल्या सर्कॅसचे कौतुक करतात. सर्कॅस येऊन जाते देखील पण गावकरी बरेच दिवस त्यांनी बघितलेल्या सर्कॅसचे (मनातील चांगले चित्रण) चर्चा करत राहतात. कोणी प्राण्याची तारीफ करतो तर कोणी कसरतींची. कोणी स्वत:चा खरा अनुभव सांगतच नाही या भीतीने कि दुस्राने वेगळा अनुभवला आहे.  
या गोष्टीच्या शेवटी असा सांगितला आहे कि जीवनात सुद्धा आपल्याला अनेक धक्के सहन करावे लागतात. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात विविध प्रॉब्लेम्सनी त्रासलेला असतो अनेक अडचणी तो सहन करत असतो. तरीही समारंभात, पूजा विधी, लग्न सोहळे या मध्ये जेव्हा लोकं भेटतात तेव्हा ते आपापले चांगले अनुभव सांगतात ,चांगल्या वस्तू मिरवतात. स्वत: कडील संपत्तीचं स्वताःच्या  designation चा प्रदर्शन करत असा भासवतात कि ते खूप खूष आहेत. आणि प्रत्येकाला असा वाटत कि समोरचा खूप आनंदी आहे. त्याला काही प्रॉब्लेम्सचं नाहीत.
या गोष्टीतली अतिशयोक्ती सोडली तरी ह्याच्या शेवटी काय लिहिले आहे ते मात्र पटण्यासारखं आहे. पण जीवानात कितीही प्रोब्लेम्स असले तरी कोणाशीही तुलना न करता आनंदी राहण तर आपल्याच हातात आहे. शेवटी काय...... LIFE GOES ON.



२ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद.... असेच होते बहुतेक वेळा आयुष्यात प्रत्येक जण एकमेकाशी उगाच तुलना करीत असतो. आणि स्वतः कडे असलेल्या गोष्टींसाठी आभार मानायला विसरतो.

      हटवा