शुक्रवार, १४ जून, २०१३

मोबाईल फोन .....

मोबाईल फोन भारतात साधारण १९९६च्या दरम्यान आले. त्यावेळी कॉल रेट आणि मेसेज रेट खूपच जास्त होते. अर्थात मोबाईल हे त्यावेळी style statement होते. ठराविक लोकं सोडले तर बाकी सर्वांसाठी ते खूपच खर्चिक होते.
आमच्या घरातला पहिला वाहिला mobile म्हणजे नोकिया ३३१५ हे मोडेल होते. साधारण २००२-०३ चा वर्ष असावं.आणि mobile म्हणजे नोकिया असे त्यावेळी घट्ट समीकरण होते.नोकियाचा भारतातील मार्केट शेयर त्यावेळी ८० टक्क्याहून अधिक होता.कारण ही कंपनी स्वस्त परवडण्यासारखे पण अतिशय टिकाऊ फोन उत्पादन करत होती.

 नोकिया ३३१५ अगदी बेसिक मॉडेल होते .
(Image courtesy - google)
florocent ग्रीन रंगाचा light यात होता.आणि त्यात काळ्या रंगाचा font होता. फोन उचलणं आणि फोन करण, मेसेज वाचण आणि मेसेज करण हे सगळं त्यात शक्य होतं.त्या व्यतिरिक्त service provider च्या अनेक facilities त्यात होत्या.games आणि ठिपके जोडून चित्र बनवणे पण होते त्यात. या व्यतिरिक्त हा फोन मजबूत होता, म्हणजे तो कसाही पडला तरी  पुन्हा व्यवस्थित चालू ह्यायचा. फक्तं battery life  तुलनेने कमी होती.

दरम्यानच्या काळात मोबईलचं प्रस्त वाढत होतं. नवीन मोबईल कंपन्या मार्केट मध्ये येत होत्या जवळपास प्रत्येक आठवड्यात नवीन mobile launch ह्यायचा.नोकिया ३३१५ च्या battery चा प्रोब्लेम जाणवायला लागल्यावर Samsung चा फ्लिप वाला mobile घ्यायचं ठरवलं, नोकिया ३३१५ ला backup फोन म्हणून ठेऊन. २००७ मध्ये Samsung चा Samsung SGH x २१० हे मॉडेल घेतले.
(Image courtesy - Google)
 मॉडेल पूर्ण पणे रंगीत होते.म्हणजे display वर सगळे रंग दिसायचे.त्याव्यतिरिक्त या mobile मध्ये बाकी features बरोबर FM Radio पण होता. Samsung SGH x २१० हा माझा पहिला मोबाईल त्यामुळे मला अगदी विशेष प्रेम होते या फोनवर. ट्रेनने कॉलेजला (प्रथम वर्ष) प्रवास करणार म्हणून त्यावेळी उपलब्ध असलेलं basic फोन मला मिळाला. मी फार खूश होती माझ्या फोनवर . २००७ पर्यंत कॅमेरा,mp३  असलेले mobile उपलब्ध झाले होते. आता मोटोरोला आणि samsung हे देखील मार्केट मध्ये खूप नवीन फोन घेऊन आले होते. या वर्षापर्यंत mobile अगदी सर्व सामान्य माणसाच्या हातात येऊन पोहोचला. नवीन सुधारित mobile models तर येतंच होती. कुठेतरी असमाधान येऊ लागलं.

अखेर २००८ मध्ये मी नोकिया ६५०० slider घेतला.
(Image courtesy - Google).
samsung ला backup फोन ठेऊन.कारण फोन exchange करून नवीन घेणं मनाला पटत नव्हतं. नोकिया ६५०० slider मध्ये basic features सोबत ३.२ mp कॅमेरा होता (उत्कृष्ट प्रतीचा), mp३ आणि mp४ (video) होतं. इंटरनेट होतं. हवी तेवढी गाणी स्टोर करायची capacity होती. हा फोन खूप कमी वेळात माझा आवडता झाला. अगदी जपून वापरलं मी याला.एकदाही पडू दिलं नाही हातातून.
पण २००९ मध्ये फोन ला एक वर्ष पूर्ण ह्यायला एक आठवडा बाकी असताना........ ट्रेनमध्ये प्रचंड गर्दीच्या वेळी तो बैगेत बाहेरच्या खणात ठेवलेला फोन चोरीला गेला.  तेही ट्रेनच्या दरवाजातून आतमध्ये जायच्या अंतरात तो चोरी झाला. दोन स्टेशन नंतर बेगेत हात घातला तेंव्हा तो नव्हता. इतकं वाईट वाटलं त्यादिवशी..फोन गेला तो गेला वरून या बेजाबदार पणा बद्दल ओरडा मिळणार होता तो वेगळा ....

 पण मोबईल ही एव्हाना काळाची गरज बनली होती त्यामुळे नवीन फोन घ्यायचा कि नाही हा पर्याय नव्हता. 

मग त्यावेळी २००९ मध्ये samsung चे touch screen mobile फोन बाजारात आठवड्या पूर्वीच आले होते.
आणि सर्व परवडण्यासारख्या range मध्ये होते.touch screen हे बाजारातल नवीन तंत्रज्ञान होत. त्यामुळे ते कस आहे, mobile कितपत टिकेल, कसा चालेल या बद्दल मनात शंका होत्या.पण फक्त samsung या नावावरून मी ठरवलं कि हा mobile चांगलाच असेल.अत्याधुनिक touch screen तंत्रज्ञान व सर्व मोबईल चे feautures.... हे या फोन चं वैशिष्ट्य होतं.त्या व्यतिरिक्त या फोन मध्ये  pdf document वाचण्याची सोय होती.battery life अप्रतीम होती एकदा चार्ज केली कि ४ दिवस नो प्रोब्लेम आणि मेसेज type करण्यासाठी पूर्ण कॉम्पुटर keyboard मोबईल screen वर यायचा.त्यामुळे सगळे letters आल्यामुळे typing खूपच fast ह्यायचं.
मी ठरवलं कि आता हा फोन जिथ पर्यंत साथ देईल तोवर वापरायचा.अगदी सांभाळून.ट्रेन मध्ये चढता उतरताना देखील mobile माझ्या bag च्या आतल्या कप्यात ठेवायची. अगदी हल्ली हल्ली म्हणजे गेल्या आठवड्या पर्यंत मी हा फोन वापरला. पण हल्ली त्याच्या तौच्स्क्रीन मध्ये प्रोब्लेम यायला सुरु झालेला.मग touch screen पूर्ण बंद झालं. मग मी repair करून घ्याच्या साठी गेली तेंव्हा authorized gallary ने सांगितले १२०० रुपये होतील आणि एकाच महिना ग्यारंटी. खूपच हताश वाटलं फोन बदलायच्या विचाराने. चार वर्ष साथ दिलेली या फोनने  मला. बरेच ठीकाणी  repair साठी बघितलं पण कोणीच ठोस guarantee देत नव्हतं. मग काय बदलायलाच लागणार हे कळलं.

२००९ ते २०१३ पर्यंत   drastic परिवर्तन घडलं होतं या क्षेत्रात.Samsung,नोकिया.मोटोरोला  या व्यतिरिक्त Apple, Blackberry, HTC, Karbon, Sony etc बऱ्याच mobile companies मार्केट मध्ये होत्या.अगदी १,००० रुपयांपासून ते ६०,००० रुपयांपर्यंत mobile फोन उपलब्ध होते. आणि दर दिवशी नवीन mobile model मार्केटमध्ये येत होते. फोनमध्ये बरेच variation आले होते. नुसता फोन नाही तर स्मार्ट फोन घ्यायचा कल वाढला होता. Android Systemचे फोन आता सर्व घेत होते.बाजारपेठेवर आता samsung चा वाटा जास्त होता. आणि tablet हे बाजारात मोबाईलला टक्कर देत होते कारण tablet स्मार्ट फोन आणि laptop या दोघांचे features देतात आणि ते प्रवासाच्या दृष्टीने देखील सोयीचे आहेत .

पण आता मला नवीन फोन मध्ये इंटरेस्ट नव्हता. actually असं वाटत होतं कि सगळ्यांना सांगावं कि  I dont use mobile...एक प्रकारच बंधन वाटत mobile.... जेवढी सोय आहे तेवढीच किंवा त्याहून अधिक गैरसोय आहे अस वाटतं. आणि मोबईल वर बोलण्यावरून जेवढे गैरसमज होतात तो एक वेगळाच मुद्दा आहे. फोन नाही केला तरी त्रास आणि चुकून नाही उचलला गेला तरी गैर समज....असो पण शेवटी प्रवाह विरुद्ध जायला खूप त्रास होतो...mobile घ्यायलाच लागला...samsung चा basic फोन घ्यायची धारणा घेऊन shop मध्ये गेली आणि samsung s ५६१०  हे मॉडेल घेतले. 
एक मात्र विलक्षण योगायोग वाटला कि हे सर्व फोन मी त्या त्या वर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेतलेले.
जिथून चालू केले तशाच पद्धतीतील  वर थोड्याफार बदलांनी (कॅमेरा, color display, fm, mp३)असलेला फोन घेतला. फक्त फोन म्हणून वापर करण्यासाठी. 

माझ्या नोकिया ३३१५ वरून samsung s ५६१० पर्यंत पोहोचण्याच्या या दहा वर्षांच्या काळात खूपच बदल घडून आले. आणि येणाऱ्या काळात अजून बरचं काही बदलेल. अस म्हणतात ना "परिवर्तन संसार का नियम है" हेच खरं.

२ टिप्पण्या:

  1. "जेवढी सोय आहे तेवढीच किंवा त्याहून अधिक गैरसोय आहे अस वाटतं. आणि मोबईल वर बोलण्यावरून जेवढे गैरसमज होतात तो एक वेगळाच मुद्दा आहे."
    so true. baki post changli lihiliye.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रतिक्रिये साठी धन्यवाद. अशाच प्रतिक्रिया देत राहाल अशी मी आशा करते.

      हटवा