रविवार, ९ जून, २०१३

स्तुती .....

प्रत्येक माणसात एक लहान मूल असत जे कोणीतरी त्याच्या बद्दल काही चांगल बोलल, स्तुती केली तर आनंदून जाते. हे माझ्या friend ने बोलता बोलता अचानक केलेलं statement. तसं बघायला गेलं तर अगदी योग्य आहे.केलेल्या चांगल्या कामाची योग्य प्रमाणात दाद तर द्यायलाच पाहिजे.त्यामुळे खरच खूप आनंदी ह्यायला होतं आणि नव्याने काम करण्यास उत्साह मिळतो.पण स्तुती योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात असावी. मनापासून असावी. आता तर सरसकट मनात असो व नसो बोलण्यासाठी लोकं बोलतात अस वाटतं. पण त्यातही काही खास व्यक्ती ज्या मनापासून आपल्याला सांगतात ती गोष्ट आयुष्यभर पुरते. बऱ्याच वर्षानंतर कोणी आपल्या कामाची दाखल घेतली आणि बोलले तरी मन स्पर्शून जाते.


तर  स्तुती या विषयावरून  मला त्यादिवशी एकदम लहानपण आठवलं .
 एकंदरीतच स्तुती  या विषयावरून लहानपणी माझी आणि माझ्या आई बाबांची अनेक वेळा चर्चा (बरेचवेळा वाद ) झाली. मुद्दा असा होता कि माझे आई आणि बाबा हे माझी कधीच कोणासमोर स्तुती करताना मला दिसले नाहीत.(कदाचित माझ्यासमोर माझी स्तीतू करत नसावेत.मी जमिनीवर रहाव म्हणून असेल.) आणि नातेवाईक प्रत्येक भेटीत आपापल्या मुलांची सरळ त्यांच्या मुलांदेखत स्तुती करायचे (मग ती मार्कांची असो  किंवा कोणत्याही स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाची. अशावेळी मला मी कोणीच नसल्यासारखी फिलिंग यायची आणि माझे आई बाबा तसा करत नाही म्हणून त्यांचा  राग  देखील. 
हा पण त्यांनी मला प्रोत्साहन नेहमी दिला. मला कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यांनी मला नेहमी हो सांगितलं आणि कधीही त्याचं मत माझ्यावर लादलं नाही .मला स्वतंत्रपणे विचार करण्यास सांगितला.नेहमी माझं मत देखील विचारात घेतलं. मला आवडलेल्या सर्व गोष्टी घेऊन दिल्या आणि केल्या.

पण मी मात्र परत परत आई बाबांना या गोष्टीची जाणीव करत होती कि हे बरोबर नाहीये.इतरांकडे पहा.असं त्यांना सांगायची. 

थोडी मोठी झाल्यावर एक दिवस बाबा मला म्हणाले मी काय सांगतोय ते शांतपणे ऐक  " हे बघ सूर्याला मी प्रकाश देतोय हे सांगायची गरज नसते .तो प्रकाश देतो तेंव्हा सगळ्या जगाला कळत कि सूर्यप्रकाश आहे . कोणाचे आई बाबा कसे त्यांच्या मुलांची  स्तुती करतात याकडे लक्ष देऊ नकोस. यावरून तू कमी आहे असे मुळीच   ठरत नाही.  स्तुती ही आपल्या पुढील यशाचा अडथला आहे. लोकं स्तुती करतात पण फक्त पालकच आपल्या मुलांना सांगतात कि मुले कुठे चुकताहेत.  हे आमचा काम आहे कि तुला तुझ्या मार्गात येणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून सावधान करण. खरे हितचिंतक फक्त आणि फक्त आई बाबाच असतात. इतर सर्व दिखावा आहे. कोणीही स्तुती केली तर  discount करायचा आणि कोणी एखादी गोष्ट ठीक नाहीये सांगितल तर ती बरोबर करण्याचा प्रयत्न करायचा. हाच मार्ग आहे यशा पर्यंत पोहोचायचा. जेंव्हा तू असा करशील तेंव्हा तुझा काम व्यवस्थित होईल आणि तुला आपोआपच कौतुक मिळेल.  तुझ्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत.तुला निवडायचा आहे तो मार्ग तू निवड.तुझ्या कोणत्याही निर्णयामागे आम्ही आहोत." 
त्या दिवशी मी विचार केला थोडा पटला देखील पण इतक्या वर्षांचा mindset बदलणे शक्य वाटले नाही.

अनेक परीक्षांमध्ये , professional exams मध्ये यश मिळाले . प्रत्येक वेळी मी खूप छान मार्कांनी उत्तीर्ण झाली. पाठोपाठ इतरांकडून स्तुती देखील असायची . नंतर एकदा माझ्या शेवटच्या   professional exam मध्ये failure आला. तेंव्हा मला जाणीव झाली कि अपयशात आपण एकटेच असतो.जे सर्व स्तुती करत होते ते आता मला टाळत होते. त्यावेळी फक्त आई बाबाच माझ्या सोबत होते. माझी समजूत काढायला कि मोठ्या एक्साम्स मध्ये होता असा, ठीक आहे. result पण ७% लागतो , अस होतं कधीतरी. पुढच्यावेळी नक्की clear होईल. वाईट नको वाटून घेऊस. मला हसवण्याचा प्रयत्न करत होते. मला आठवत त्यावेळी  result च्या दिवशी बाबांनी सुट्टी घेतली माझ्यासाठी आणि result आला तेंव्हा माझ्या सोबत तेदेखील रडले होते.
आणि खरच या result मुळे माझे डोळे उघडले.मला कळल कि स्तुती काय असते. खरोखर स्तुतीच्या आहारी गेल्यावर एक दिवस आपटायला होतं. त्या दिवशी मला खरोखर सवतः बद्दल खूप लाज आणि चीड वाटली कि मी आई बाबांना किती त्रास दिलाय या स्तुती विषयावरून. 
नंतर professionally qualified झाल्यावर परत comments मिळाल्या इतरांकडून कि आम्हाला माहित होत कि तू  हुशार आहेस.हे पार होणारच. खूपच छान, इत्यादी.
पण यावेळी मला माहित होत कि काय करायचं आणि मी ओवर भारावून पण नव्हती जाणार.फक्त मनातल्या मनात हसू आला कि काहीच बदलत नाही.फक्त आपल विचार करण बदलत.त्या दिवसापासून मी स्तुतीला योग्य तऱ्हेने स्वीकारायला शिकले.