शुक्रवार, १२ जुलै, २०१३

व्होट्स app......

भारतात android system चे फोन आल्यावर त्यांची लोकप्रियता वाढली आणि खरोखर android फोन ने मार्केट काबीज केले.  मला वाटत android फोन हे जवळ पास २०११ ते २०१२ पर्यंत सर्वा पर्यंत पोहोचले. ते स्वस्त होते आणि त्यांमध्ये smartphones ची features पण होती.अनेक फ्री apps हे या फोन्स चे विशेष. त्यापैकीच एक whats app हे आहे. whats app हे  अतिशय लोकप्रिय app आहे.
तर मी या आधीच्या लेखात  सांगितल्या प्रमाणे माझा फोन upgrade नाही केला. (नवीन विकत नाही घेतला). आणि माझ्या फोनवर android system नसल्यामुळे त्यावर whats app वापरणं अशक्य होत. कारण whats app साठी android फोन असणं जरुरी आहे. आणि मला माझा फोन android नाही किंवा  माझ्या फोनवर whats app नाही याबद्दल कसलीच खंत नहव्ती. खरतर मी माझ्या फोनवर खूपच खूष होती आणि अजूनही आहे. कारण माझ्यासाठी तो एका फोन ने जे काम केले पाहिजे ते तो अचूक करतोय.

दरम्यानच्या काळात माझ्या मैत्रिणी आणि मित्रांनी आपापले फोन upgrade केले(बदलले). आणि सर्व जण विविध apps ची चर्चा करू लागले. सर्व एकमेकांशी whats app वर भेटू लागले आणि त्यावर चर्चा करू लागले. मला बरेच वेळा बऱ्याच जणांनी फोन बदलायचा सल्ला दिला :-) whats app वर का नाही असा विचारल. अगदी कॉलेज मध्ये lecture चालू असताना किंवा क्लासेस मध्ये lecture चालू असताना देखील whats app चालू असायचे सगळ्यांचे. मला खरोखर नाही कळायचं कि एवढी काय मजा आहे या app मध्ये. या काळात माझ्यावर outdated चा शिक्का बसला. मला खूप वाईट वाटायचं हे बघून कि हे सगळे का क्लासेस मध्ये व lecture मध्ये लक्ष्य देत नाहीत. मग आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि सगळे वेगळ्या वाटांनी निघाले.

या वर्षी फेब्रुवारीत मी tablet विकत घेतला प्रवासात laptop ला पर्याय म्हणून. Tablet वर app मार्केट मध्ये मला whats app दिसले. मी ते download करण्या आधी त्याची माहिती वाचली -
whats app चा exact काम असा कि हे app download करावे लागते. आणि प्रतिवर्षी ठराविक रुपये (१००रु  पर्यंत) भरावे लागतात . ही फी वर्ष भरासाठी असते . त्यात register केल्यावर whats app आपापोप आपल्याला दाखवते कि आपल्या फोन मधले कोण कोण whats app वापरात आहेत.आणि आपण त्यांच्याशी २४*७ संपर्कात राहू शकतो तेही अगदी free म्हणजे अधिक पैसे न भरता (विनामूल्य).कितीही वेळ आपण chatting करू शकतो या app वर. आणि individual तसेच group chatting चा पर्याय पण आहे यात.

मग काय app download केले. आणि registration झाल्यावर माझ्या फोनवर contact लिस्टमध्ये असलेले आणि जे हे app वापरत होते ते सगळे दिसले. मला या app मध्ये बघून सगळे आश्चर्यचकीत झाले. app मध्ये माझं 'भव्य' स्वागत झाले  :-) किती तरी जणांना खरच वाटत नव्हतं कि मी हे app वापरणं चालू केलेय. मग chatting सुरु झाली. app च्या वापराच्या पहिल्या दिवशी मी दर पाच मिनिटांनी app वर जात होते कोण काय बोलतय हे वाचत होते आणि reply करत होते. नंतर मी आमच्या group च्या chat वर add  झाले. group chatting चा प्रकार बघितला. गुड मोर्निंग ते गुड night सर्व chat वर बोलत होते सगळे. पहिल्या दिवशी मजा आली. दुसऱ्या दिवशी पण सुरुवात गुड मोर्निंग ने , मग काहीही गप्पा. त्या दिवशी busy असल्याने मला पूर्ण दिवस app वर जाता आला नाही आणि रात्री बघितला app तर जवळपास ६०० च्या वर chat मेसेज वाचायचे बाकी दिसले. पूर्ण वाचून संपवले. तिसऱ्या दिवशीही तेच झाले जे दुसऱ्या दिवशी झाले.

हे app आहे चांगलं यात प्रश्नच नाही .पण आपण ठरवायला हवं कि कुठे थांबायचं .
मला वाटलं कि कदाचित हे app माझ्यासाठी  योग्य नाही. कुठे तरी तोचतोचपणा जाणवत होता. रोज आपल सकाळी गुड मॉर्निंग पासून गुड night पर्यंत बोलणं. सतत कोणाशीही किती बोलणार (अर्थपूर्ण?). मला कुठे तरी हेही टोचत होतं कि पूर्ण दिवसानंतर थोडा वेळ जो आपल्याला मिळतो तो आपल्या स्वताःसाठी आणि परिवारातील सर्वा बरोबर घालवणे खूप आवश्यक आहे. आणि ज्यांना आपल्याला भेटावेसे वाटते किंवा ज्यांच्याशी बोलावेसे वाटते त्यांना प्रत्यक्ष भेटून किंवा फोन वर बोलून मिळणार समाधान हे वेगळचं असत. त्यासाठी सतत app वर असण्याची गरज नाही अस मला वाटत. 

जेंव्हा मला असा जाणवल मनाशी निर्णय पक्का केला आणि मी लगेच  tablet वरून माझं app बंद केलं आणि account deactivate केलं. खूप बर वाटतंय. मोकळं झाल्यासारखं वाटतंय. कधीतरी असं 'outdated' असणं चांगलं असं वाटतय आता.