शनिवार, १३ जुलै, २०१३

जीवन असेही !!!! ............


आज मला काय लिहायचं हेच सुचत नाहीये..... मन शांतच होत नाहीये, अस्थिर वाटतंय ....अनेक विचार उगाच डोकावताहेत. तसं फार काही वेगळं नाही झालेलं ....आपण आजूबाजूला बरेच वेळा बघतो तेच आहे पण तरीही ते serious पणे विचार करण्यासारखं आहे. कारण आजच्या पिढीवर उद्याचं भवितव्य अवलंबून आहे.

दर शनिवार प्रमाणे मी मंदिरात गेली होती. मंदिरातून  दर्शन घेऊन बाहेर आली आणि रस्ता क्रॉस करण्यासाठी उभी होती ( वेळ साधारण रात्रीचे सव्वा नऊ ) तेव्हा रस्त्याच्या कडेवरच्या सोसायटीतून एक पांढऱ्या रंगाची (स्कोडा रापिड) कार बाहेर आली. कारमध्ये ड्रायविंग सिट वर एक मुलगा बसला होता त्याच्या बाजूला मुलगी मागच्या सिट वर एक मुलगा आणि अजून एक मुलगी. (सर्व विशीतल्या वयोगटातले) खूप गप्पा मारत होते. स्वतः च्या विश्वात होते ते. पण त्यानंतर जे बघितलं ते धक्कादायक होतं. पुढे बसलेल्या मुलीने सिगारेट पेटवली आणि ओढायला सुरुवात केली. (असं टाउन साइड ला बघितले आहे. काही कॉलेजेस च्या बाहेरही बघितले आहे पण आमच्या राहत्या ठिकाणी बघितल्याची ही पहिलीच वेळ.) सिगारेटचा  धूर फेकत स्वःतच्या विश्वात राहणाऱ्या तिला, मी एकक्षण बघत राहिले. त्यांचं बोलण चालूच होतं ...कार सुरु झाली आणि ते निघून गेले. (मला क्षणभर भीती वाटली कारण rash driving करणारे पण हीच मुले असतात. ) मध्ये मध्ये हात बाहेर काढून सिगरेटला झाडत होती ती .एवढ्या रात्री ते कुठे जाणार होते काय माहित....(ते डिस्को, पब etc चं वेगळ जग असाव बहुतेक ) नको तेवढे नेगेटिव विचार आले मनात. मला आश्चर्य वाटलं कि असं काय झालं असेल कि तिला यात मजा येत असेल ?...घरच्यांचं काय ? त्यांचं लक्ष कुठाय ? कशाचीच कशी काळजी वाटली नाही तिला ? तिच्या उद्याची...तिच्या आरोग्याची ..... तिच्या जीवनशैलीची ? यात तिचा एकटीचा पण काही दोष नाही म्हणा ( असे तर बरेच आहेत ) कारण आताचं राहणीमान पण तसच झालय बहुधा .... सगळेच प्रचंड तणावाखाली वावरतोय...कदाचित घरी पालक नसतील....ते असल्यास त्यांच्याकडे बोलायला वेळ नसेल..... किंवा पालकही स्वतःच्या विश्वात इतके मग्न असतील कि त्यांना आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चाललय याची दखल घ्यायला वेळ नसेल... नुसते पैसे दिले कि तर वेळेची किमतही भरून येते असं वाटत असेल त्या पालकांना ?.... एवढ्या कमी वयात अशी कार आणि पैसे  हातात असल्यावर चुकीचं वळण घेणं कठीण नसावं, नाही का ? 

विचार करून मला असह्य ह्यायला लागला, यापूर्वीचे प्रसंग पण आठवले. साधारणपणे तीन वर्षांपूर्वी मी लिंक रोड वर गेले होते कामानिमित्त (वेळ सकाळी ११ वाजता ) त्यावेळी रोड च्या बाजूला एक गाडी थांबली.... गाडीत आई आणि मुलगी होती (दोघीही राहाणीमानावरून well to do वाटत होत्या.), मुलगी ड्राईव्ह करत होती , तिच्या आईने माझ्या समोरच्या दुकानात पत्ता विचारला . गाडीतून धूर येत असल्यासारखं वाटलं, तेव्हा माझं गाडीत बसलेल्या मुली कडे लक्ष गेलं . असेल तिशीतली ... ती सिगारेट ओढत होती.... खरा धक्का नंतर बसला  जेव्हा ती गाडीतून उतरली आणि तिला पूर्ण पाहिलं . ती pregnant होती, सहा - सात महिन्यांची. आणि ती सिगारेट ओढत होती ...... आणि आई पण बरोबरच होती तिच्या...... त्या बाळाचं आरोग्य आणि जीवन कसं असेल या बद्दल विचार करून खूप वाईट वाटलं .

यानंतर चा अजून एक प्रसंग.... (दोन वर्षांपूर्वीचा) रिक्षांचा बंद होता दोन दिवस... दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संप मागे घेतलं गेला..... खूप पाऊसही होता त्यादिवशी मुंबईत... मी पार्ल्यात होते .... निघायला उशीर झालेला....साधारण सात वाजलेले. एक रिक्षा आली माझ्या थोड्याश्या अंतरावर असलेल्या मुलीने पकडली ..... मी मनात म्हंटल आज एवढ्या लांब चालावं लागणार बहुतेक. तेवढ्यात रिक्षा थांबली माझ्या समोर बघितलं तर ओळखीचे रिक्षा वाले काका होते. त्यांनी तिला विचारलं चालेल का कारण तिला पण स्टेशनला जायचं होत...ती हो म्हणाली (राहण्यावरून प्रोफ़ेशनल वाटत होती ) ...नंतर थोडं अंतर गेल्यावर तिने सिगरेटचा पाकीट काढलं आणि lighter ने लावून सिगारेट ओढायला चालू केली. मला जे घाबरायला आणि अस्वस्थ ह्वायला  झालं ते मी कधीच विसरणार नाही. वर माझ्याकडे बघून ती मला हसून विचारते कि dont have any problem na ? मी काय सांगणार ? मला सुचतच नवतं काय बोलायचं ते....असं वाटलं रिक्षा सोडून उतरावं आणि सरळ चालत स्टेशन गाठावं.....अगदी थांबवायला सांगणार  रिक्षावाल्या काकांना तोपर्यंत बघितलं तर स्टेशन जवळ आलं होत . सुटका झाल्यासारखं वाटलं. घरी येऊन आईला सांगितलं तर ती उलट मलाच ओरडायला लागली कि तुला असं यायची काय गरज होती....असं कधीही नाही करायचं.....उतरायचं होतंस रिक्षातून ..... आणि अनेक प्रश्न आणि शंका...असो पण त्या दिवशी जसं वाटलं तसच आज हे लिहिताना पण वाटतंय. काटे आलेत हातांवर....

ड्रिंक्स घेणं , सिगारेट सेवन करण (ड्रग्ज च्या बातम्या पेपरात येतात) हे सर्व काय चाललय कळतच नाहीये. कुठे वाहवत चालली आहे ही पिढी ? ह्या सर्वाचे काय परिणाम होणार आहते ? ज्या देशात तरुणाई जास्त आहे हे देशाला विकासाच्या दृस्ठीने पूरक असते असे म्हणतात , तरी हीच तरुणाई जर चुकीच्या मार्गावर जात असेल तर काय होईल भवितव्याचे? आपल्याला मिळालेल्या संधी आणि आपल्यासाठी पूर्वजांनी कष्टाने कमावलेलं स्वातंत्र्य हे अमुल्य आहे आणि असं वर्तन करून  ह्याचा आपण अपमान करत आहोत हे त्या मुलांना समजेल तो सुदिन. कदाचित त्यांना हे कधीच समजणार देखील नाही.

एकीकडे काबाड कष्ठ करून देखील शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही किंवा नोकरी मिळवण्यासाठी आणि मिळालेली टिकवण्यासाठी धडपड करणारे दिसतात...आणि दुसरीकडे असे चुकीच्या मार्गावर गेलेले दिसतात.... शेवटी या दोन्ही जीवन नावाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

(P.S. लेख लिहायचा कि नाही या द्विधा मनस्थितीत होते मी. पण लिहायला घेतलं. आता खूप मोकळं वाटतंय. मनातलं विचारंच वादळ तात्पुरत शांत झालंय.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा