शुक्रवार, २ मे, २०१४

अक्षय तृतीया आणि ब्लोग्गिंग विश्वातलं पाहिलं वर्ष -------

आजच्या अक्षय तृतीया तिथीला माझ्या ब्लोग्गिंग मधल्या प्रवेशाला तिथी प्रमाणे एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षात अनेक माझ्या आयुष्यात अनेक वळणं आली, काही उत्तम, काही चांगली तर काही ठीक. पण एकंदरीत ब्लोग्गिंगने मला अनुभवाने समृद्ध केलं. या एका वर्षात ब्लोग्गिंगमुळे माझ्यात खूप चांगले बदल घडले.

(माझे नवीन घेतलेले imitation jwellery/  पितळेचे  कानातले - )

हे बदल क्रमशः असे -

१) मी माझं मत किंवा माझे विचार  मांडायला शिकली, आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मला खूप सारे नवीन ब्लोग्गर मिळाले ज्यांच्या कडून मला प्रोत्साहन मिळालं. आत्मविश्वास मिळाला. 

२) सगळ्यात महत्वाचं - मला माझा छंद गवसला/ कळला - फोटोग्राफी ( मी फोटोग्राफी ब्लॉग "http://hobbyofphotography.blogspot.in/ " तयार केला ज्याची दर्शक/ वाचक संख्या एका वर्षात २०,७०० पेक्षा जास्त आहे. (आजच्या दिवसा पर्यंत म्हणजे हा लेख लिहे पर्यंत २०,७४५ वाचक/ page views). 
आजचा Alexa Rank (जगभरातील websites मधून ) -  आज माझा ब्लॉग जगभरात ३,४५,६९९ व्या स्थानावर आणि भारतात २९,७२३ स्थानावर आहे. ब्लॉगच्या पहिल्या वर्षात हि लक्षणीय झेप आहे. 

3) ब्लोग्गिंग सुरु केल्यापासून मी जास्त सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली आणि आनंदी राहायला शिकली.

४) या ब्लॉगवर मी जास्त अजून काही लिहिला नसलं याचं कारण हेच होतं कि मी फोटोग्राफी ब्लॉगवर जास्त वेळ देत होती. पण आता मी इथे पण नियमित ठराविक दिवसांच्या अंतराने लिहेन. मला मराठी typing चा अनुभव हा या ब्लॉगने दिला.    

५) जेंव्हा जगभरातील फोतोग्राफेर्स आणि देशभरातील लोकांनी माझ्या फोटोस चा कौतुक केलं तेंव्हा मला खूप बर वाटलं. असं वाटलं कि मी पण काहीतरी करू शकते. स्वतःला hopeless समजण्याच्या दृष्टीकोनातून मी बाहेर आली. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 

६) इतरांच्या कलेकडे बघून आणि निरीक्षण करून मला फोतोग्राफितले बारकावे शिकायला मिळाले. आणि मी अजूनही शिकत आहे. इतरांचे लिखाण आणि ब्लोग्गिंग अनुभव वाचन करून मला खूप काही शिकायला मिळालं.

७) ब्लोग्गिंगने मला शिकवलं कि कोणतीही गोष्ट वाढायला आणि ती रुळायला (to get established ) वेळ लागतो. आणि कोणत्याही गोष्टीत पूर्ण लक्ष्य दिलं अथवा प्रयत्न केले तर यश मिळतचं.   रातोरात ब्लॉग मोठा होत नाही तर तो वाढवायला आणि टिकवायला मेहनत आणि determination लागते. आणि हेच जीवनात देखील applicable आहे. रातोरात काही मिळत नाही तर ध्येय आणि दिशा ठरवून मेहनत घेतल्यावर अपेक्षित प्राप्त होतं यावर माझा विश्वास बसला.

८) सगळं (qualification, प्रसिद्धी )असूनही down to earth  असलेली माणसं आणि त्यांचे अनुभव मला ब्लोग्गिंग मुळे  अनुभवायला आणि वाचायला मिळाले.

९) मला अभ्यासात आणि professionally पण या अनुभवाचा आणि आत्मविश्वासाचा खूप फायदा झाला. आणि या एका वर्षात मी  professionally settle झाली (माझे छंद फोटोग्राफी आणि लिहिणे याव्यतिरिक्त  ). 

ब्लोग्गिंग ने मला खूप काही दिलं , जे मी केवळ शब्दात वर्णन नाही करू शकत. आजच्या दिवशी अशीच प्रार्थना करते कि येणाऱ्या वर्षांतून  मला ब्लोग्गिंग मधून खूप चांगले अनुभव प्राप्त होऊन देत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा