रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

गणेश चतुर्थी ................

ढोल ताश्यांसाहित बाप्पाचे आगमन आज संध्याकाळ पासून ह्यायला सुरुवात झाली आहे. घरातील गणपती यायला देखील सुरुवात झाली आहे. झांज वाजवीत, "गणपती बाप्पा मोरया,मंगलमुर्ती मोरया" चा गजर करत बाप्पाचे आगमन होत आहे. खूप प्रसन्न वातावरण आहे. काही गणपतींचे आगमन कारमधून, काहींचे रिक्षामधून  काहींचे टेम्पोमधून तर काहींचे हातात धरून मिरवणूक काढत ........ पण सर्वांचा भक्तीभाव एकच.
(Image Source : my Photography Blog)


गणेशोत्सव हा अतिशय प्रसन्न वातावरणात आणि भावभक्तीने साजरा केला जातो. घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळामध्ये गणेशोत्सव श्रीगणेशाच्या मूर्तीचीप्रतिष्ठापना करून उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवाचा हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. मला गणेशोत्सव सर्व सणांमध्ये जास्त आवडतो.

गणपतीसाठी आसने, फुले, दागिने, सजावटीचे साहित्य इत्यादींनी बाजार भरला आहे. आणि तुडुंब गर्दी देखील होत आहे. 

विविध प्रकारचे पूजा साहित्य .........

 वेगवेगळ्या प्रकारांचे दिवे ..............

गणपतीसाठीचे  दागिने .......

सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गेल्या अनेक दिवसांपासून घाईने सर्व तयारी करीत आहेत. डेकोरेशन, स्टेज घालणं, दिव्यांची रोषणाई ही सर्व कामे चालू आहेत. काही दिवसांपुर्वी मी आमच्या जवळच्या मंदिरात गेली होती तेंव्हा रात्री दहा वाजता सुद्धा मेहनत घेऊन सजावट  पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत होते मंडळातले. तेंव्हा मला जाणवल कि आपल्याला दिव्यांची रोषणाई दिसते सुंदर सजावट दिसते पण त्यामागे कित्येक जणांची दिवस रात्र मेहनत असते.




गणेशोत्सवात दादर ला एक वेगळंच फिलिंग असत. फुल बाजार, सजावटीचे विविध रंगांमधले साहित्य, विविध आकारातले दिवे आणि इतर पूजा साहित्य ............. नुसत बघायला पण खूप छान वाटतं.

खरा पारंपारिक गणेशोत्सव बघायला मिळतो तो गावात. माझी अशी इच्छा आहे कि एकदा तरी अगदी तयारी पासून ते गणपती बाप्पाच्या विसर्जनापर्यंत मला गावी गणेशोत्सव साजरा करायचा आहे.
   
या सणामध्ये मला कसे वाटते हे शब्दात सांगणे कठीण आहे पण एक नक्की कि शांत झाल्यासारखे वाटते , ताणतणावाटून मुक्त झाल्यासारखे वाटते. गणेशोत्सवातल्या या आठवणी मला वर्षभर लक्षात राहतात आणि प्रसन्न वाटत.

 गणपती बाप्पा मोरया !!!!!!! मंगलमुर्ती मोरया !!!!!!!!








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा