सोमवार, ३ जून, २०१३

फरक व्यक्त करण्यातला.....

दोन व्यक्ती एकाच घटनेचा वेगळ्या पद्धतीने विचार करतात. प्रत्येकाचा त्या घटनेकडे बघायचा दृष्टीकोन वेगळा असतो. म्हणूनच कदाचित म्हण आली असावी कि व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. शेवटी ती घटना किंवा भावना आपण कशी interpret केली आणि व्यक्तं केली यावर सगळा अवलंबून असत.
गेल्या आठवड्यात मला एक  ई मेल फोरवर्ड केला होता. त्यामध्ये एक गोष्ट वाचण्यात आली.मनोमन पटली देखील.
त्या गोष्टीत दोन मुलगे (अ आणि ब ) आणि त्यांच्या पत्नी (मिसेस अ आणि मिसेस ब) ह्यांचे संभाषण सांगितले आहे.

तर मिसेस अ आणि मिसेस ब या दोघी मैत्रिणी आणि शेजारी असतात. त्या नवरे ऑफिसला गेल्यावर भेटतात. मिसेस अ सांगते "काल माझा नवरा ऑफिस  वरून आला.फ्रेश होऊन लगेच जेवायला बसला.आणि जेवण झाल्यावर लगेच झोपायला गेला आणि २ मिनिटांत झोपला देखील. बोलायला किंवा विचारायला वेळ देखील दिला नाही त्याने ". मिसेस ब सांगते "काल माझी संध्याकाळ खूप छान होती. माझा नवरा काल ऑफिस वरून आल्यावर आम्ही जेवायला बाहेर हॉटेल मध्ये गेलो. नंतर खूप लांबवर आम्ही दोघ चालत आलो आणि घरी आल्यावर त्याने घरभर कॅण्डलस (मेणबत्ती) लावले." यावर मिसेस अ, मिसेस ब ला म्हणाली खूप लकी आहेस तू.

ऑफिसमध्ये (मिस्टर) अ आणि ब  लंच मध्ये बोलतात. अ सांगतो " काल दमायला खूप झाला होता कामामुळे. मी घरी गेलो.तर मस्त  जेवण तयार होता. जेवलो आणि लगेच मस्त झोप पण लागली. यावर ब सांगतो " लकी आहेस तू. काल संध्याकाळ माझ्यासाठी खूप कठीण होती . मी घरी गेलो तेंव्हा आठवण झाली कि मी लाईटचं (इलेक्ट्रिसिटी) बिल नाही भरलय. त्यामुळे बायकोने जेवण नाही बनवलेलं, मग काय तसेच निघालो दोघेही बाहेर हॉटेलमध्ये जेवण घ्यायला. हॉटेलमध्ये जेवल्यावर होती पाकिटात ती सर्व कॅश खर्च झाली. त्यामुळे येताना चालत आलो एवढ्या लांबून.घरी आल्यावर लाईट नव्हते म्हणून मग घरभर  मेणबत्त्या लावण्यात वेळ गेला.एवढा सगळा थकण झाल्यावर झोप कसली येतेय. कसा तरी झोपायचा प्रयत्न केला. झोप लागते तो पर्यंत सकाळ झाली."

 अ आणि ब  आणि त्यांच्या पत्नी मिसेस अ आणि मिसेस ब यांनी सारख्या घटनांचा वेगळ्या पद्धतीने विचार केला आणि वेगळ्या पद्धतीने त्या व्यक्त केल्या.

म्हणजे आपण जसा विचार करतो आणि व्यक्त करतो त्यावर सगळा अवलंबून असता.एखादी नेगेटिव गोष्ट देखील पोसीटेवली घेतली तर गोष्टी सोप्या होतात आणि जगणं पण सोपं होतं.