बुधवार, १७ जुलै, २०१३

नैसर्गिक प्रलय आणि त्यानंतर होऊन गेलेला एक महिना

केदारनाथ मध्ये झालेल्या प्रलयाला एक महिना कधी होऊन गेला कळलंच नाही, असं वाटतं कि आठवड्या पूर्वीचीच घटना आहे....ढगफुटी आणि पूर यामुळे आलेला प्रलय, आठवलं कि अजून शहारा येतो...एकेकाळचं गजबजलेलं मंदिर अचानक अगदी शांत झालं. टीवीवरचे परत परत तेच क्लिप्स बघून खूपच त्रास झाला. कितीतरी जण दगावले...अनेक बेपत्ता झाले....आणि  नंतर राहिलेल्या त्या एकेकाळच्या वैभवशाली परिसराकडे बघून वाटले कि निसर्गा पुढे आपण खूपच छोटे आहोत....

 त्यात बऱ्याच घटना अथवा प्रसंग असे आहेत कि ते मनाला स्पर्शून गेले, काही घटना मनाला टोचून गेल्या, काही घटनांनी कासावीस ह्व्यायला झालं तर काही घटनांनी डोळ्यातून पाणी आणलं....


१)माझ्या असं वाचनात आलं कि तिथल्या प्रशासनाला आधी सूचना मिळाली होती पण तरीही त्यांनी त्याप्रमाणे ठोसपणे त्यावर काही केलं नाही, याला कोण जबाबदार आहे, काय माहित ? अर्थात प्रत्येक जण जबाबदारी झटकेलंच... 
आणि अजून एक म्हणजे त्याप्रदेशात पर्यटक आणि भाविक खूप येतात म्हणून प्रचंड प्रमाणात बांधकामे झाली होती  (बरीचशी नियम धाब्यावर बसवून) आणि अक्षरशः पत्त्याची रचना पडावी तशी नदीच्या जवळ असलेली हॉटेल्स आणि बिल्डिंग  कोसळताना दिसली. 

२) घटना घडून गेल्यावर त्यावरून देखील राजकारण झालं हे तर सर्वात मोठं दुर्देव. या राजकारणावरून अधिक न बोलणंच बरे .पण हे खूपच मनाला टोचून गेलं.

३) तसेच मीडिया वाले किती अति करतात याची त्यांनी "परत" प्रचीती दिली.....एकच चित्रित केलेला प्रसंग परत परत दिवसभर दाखवणे, नंतर .... चैनेलची टी.आर.पी वाढवण्यासाठी "क्ष्क्लुसिव रीपोर्ट" प्रक्षेपित करणे.... आम्ही किती कठीण परीस्थित हे चित्रण दाखवतोय, हे सांगणे.... चैनेलचे प्रतिनिधी प्रत्यक्षात मंदिरापर्यंत पोहोचून अगदी मंदिराच्या आतपर्यंत चित्रण करून दाखवत होते.... कंटाळा आलाय या सर्वच आता ...... चैनेल वाल्यांना असं कधीही का नाही वाटलं कि आपल्या अशा सततच्या हस्तक्षेपामुळे मदतकार्यास पण अडथळे निर्माण होऊ शकतात ? त्यांना तसं वाटणं म्हणजेच एक अशक्य गोष्ट आहे.

४) ज्यांनी हे (प्रलय) स्वतः झेलले आणि ते या प्रलयातून वाचले , त्यांचे एकेक अनुभव खरोखर डोळ्यातून पाणी आणणारे होते......
  
५) तिथल्या स्थानिक लोकांनी जे वर्तन केले ते वाचून असे वाटले कि जणू माणुसकीच राहिलेली नाही आता.....
या स्थितीतही "फायदा" घेण्यासाठी तिथे पाण्याची बाटली देखील ४० रुपये दराने विकत  होती ती लोकं ...... चोऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे लिहून आले होते पेपरात....अन्न देखील उपलब्ध नव्हतं....

६) या सगळ्या मध्ये जर खरोखर कोणी माणुसकी दाखवली तर ते म्हणजे सैन्याच्या जवानांनी.... खरोखर ते देवदूतच असावेत असे वाटले असेल त्या सर्व लोकांना .....अविरत मेहनत घेऊन त्यांनी दुर्घात्नाग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी स्वतः च्या जीवाची पराकाष्टा केली.... या मध्ये दुर्देवाने एका हेलिकॉप्टर चा  अपघात झाला आणि दोन जवान शहीद झाले..पण तरीही इतर जवानांनी तेवढ्याच उमेदीने काम सुरूच ठेवले. मन भरून आलं त्या जवानांसाठी...... त्या सर्वांचे आभार कितीही मानावे तेवढे कमीच ठरतील.

सर्व परत पूर्ववत ह्यायला खूप वेळ लागेल..... एका गोष्टीच नवल वाटलं ते म्हणजे एवढा प्रलय येऊन गेला पण मूळ प्राचीन मंदिराचं खूप नुकसान नाही झालं ...... म्हणजे हे मंदिर एक उत्तम स्थापत्य कलेचे उदाहरण आहे...जे असही सांगते, कि प्राचीनकाळी उत्तम स्थापत्य कला अवगत होती.

जीवन सतत पुढेच जात असत हे एक मोठं सत्य आहे ....कालांतराने आजची परिस्थिती पूर्ववत होईल .... परत भाविक आणि पर्यटक तेथे जमा होतील... पण हा प्रसंग  मात्र  सर्वांच्या लक्षात राहील.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा