गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१३

नेतृत्व......

उत्तम नेतृत्व असेल आणि त्या सोबत योग्य योजना आखल्या गेल्या असतील तर प्रगती आणि विकास लवकर घडतो.

मला राजकारणात विशेष रुची नाही. परंतु बरेच वेळा मी टीवी लावल्यावर लोकसभा,राज्यसभा अशा वाहिन्या   बघते. कधी तरी मुलाखती बघते. आपण प्रत्येक गोष्टींमधून चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत. नकळत का होईना पण आपण जे बघतो,वाचतो याचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्यामुळेच मला प्रभावशाली  व्यक्तींची (राजकीय, व्यावसायिक, उद्योजक, कलाकार, खेळाडू) मुलाखत अथवा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल वाचायला आवडतं कारण त्यातून प्रेरणा मिळते .

काल टीवी बघत असताना एका वाहिनीवर कार्यक्रम चालू होता ... तिथे बिहारचे माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार जी उपस्थित होते. आणि त्यांनी खूपच समर्पकपणे बिहारच्या प्रगती बद्दल सांगितलं, त्यांनी राबविलेल्या योजनांनी काय फायदे झाले....त्यांच्या योजना कितपत सफल झाल्या या सर्वा बद्दल माहिती दिली. त्यांचे म्हणणे पटले. त्यांना किती समस्यांना सामोरे जावे लागले हे देखील कळले. 

या कार्यक्रमाचे आधीचे भाग इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पहिल्या भागात गुजरात चे माननीय मुख्यमंत्री  मोदी जी उपस्थित होते. अत्यंत प्रभावशाली आणि समर्पकपणे त्यांनी भाषण केले आहे .
   
मला असं वाटत कि उत्तम नेतृत्व आणि सर्वांना आपल्या सोबत घेऊन विकास करणे ही खरी सर्वांगीण विकासाची गरज आहे. आणि देश प्रगत होण्यासाठी सर्वांगीण विकास म्हणजे समाजाच्या सर्व टप्प्यातील व्यक्तींचा विकासात समावेश होणे  महत्वाचे आहे. आणि यासाठी सर्व लोकांनी एकत्र येऊन प्रयत्नशीलपणे काम करायला हवे. जर सर्व लोकांनी स्वतःचे योगदान दिले तर राज्यांचाच नाही तर देशाचा देखील भरपूर विकास होईल.

कालच्या कार्यक्रमाच्या (तिसरा भाग) video लिंक खालीलप्रमाणे आहेत :-
आणि याच कार्यक्रमच्या पहिल्या  भागात गुजरात चे माननीय मुख्यमंत्री  मोदी जी उपस्थित होते. त्या कार्यक्रमाची लिंक खालील प्रमाणे आहे :-

(p.s:  हा लेख फक्त माहिती देण्यासाठी लिहिलेला आहे. काहीही आक्षेपार्ह वाटल्यास कृपया e mail द्वारे संपर्क साधावा. ) 
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा