गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१३

चांगला आज (वर्तमान) जगण्यासाठी......

 (Image source: my photography blog)

सर्वांनाच चिंतामुक्त आणि तणाव विरहित जगण्याची इच्छा असते, पण सर्वच हे करण्यात यशस्वी होतातच असं नाही.....काही गोष्टी केल्या तर आपण वर्तमानाची काळजी सोडून आनंदाने वर्तमान जगू शकतो. त्या गोष्टी म्हणजे :-

१) प्रत्येक वेळी बरोबर (योग्य) असण्याचा हट्ट करू नये.

फारच थोड्या बाबी योग्य आणि अयोग्य अशा वेगळ्या  एकमताने ठरवल्या जातात. एखादी गोष्ट चूक आणि बरोबर असणे हे प्रत्येकाचे वेगळे मत असते. आपल्या दृस्ठीने जर बरोबर असेल तर जरुरी नाही कि ते समोरच्याच्या दृस्ठीने पण बरोबरच असेल. जेंव्हा आपलं घरच्याशी , शेजाऱ्यांशी किंवा कोणाशीही एकमत होत नसेल तर आपलं मत लादण्या पेक्षा त्यांचं तसं म्हणणे का आहे यावरही विचार केला तर गोष्टी सोप्या होतात आणि वाद टाळतात. नवीन आणि इतराच्या कल्पनांसाठी वाव देणे यातून आपल्याला बराच काही शिकता येतं.
दुसरे काय करताहेत हे पाहण्यावर लक्ष देऊ नये, पण ह्यावर लक्ष द्यावं के ते जे करताहेत ते ते का करत आहेत.

२) स्वतःच्या चुकांबद्दल काळजी करणे थांबवले पाहिजे..


चुकांमधूनच आपल्याला शिकायला मिळत. चुका होतील या काळजीने आपण काही केलंच नाही तर ही सर्वात मोठी चूक असेल. कोणतीही नवीन गोष्ट करताना मनात संभ्रम होणे साहजिक आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे कि (कामाच्या) शेवटी आपण यशस्वी होऊ किंवा आपण काही नवीन शिकू.

३) त्या गोष्टींची काळजी करणे सोडले पाहिजे ज्यांच्यावर आपलं नियंत्रण नाही.


सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. अशावेळी त्या गोष्टी तशाच प्रकारे मान्य करण जास्त बर. अशावेळी आपण आपली मानसिकता आणि त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक बनवला पाहिजे. या साठी मी वाचलेला एक सुविचार  लिहेन तो असा कि “Nobody can go back and start a new beginning, but anyone can start today and make a new ending.”


४) Politically Correct  असणं सोडलं पाहिजे.


नेहमी स्वतःला जे योग्य वाटतं ते मत मांडण महत्वाचं आहे. बरेच वेळा आपण आपल खरं मत व्यक्त करायला अडथळतो. आणि नंतर अपराधीपणाची भावना येते. म्हणूनच सरळ जे वाटतं ते बोलणं केव्हाही चांगलं (पण कोणालातरी ते दुखावणार नसावं) .  

५) दुसऱ्याकडे काय आहे याबद्दल विचार करण थांबवलं पाहिजे.

बरेच वेळा  आपण दुसऱ्यांकडे काय आहे हे बघून दुःखी होतो. असा वेळीस आपण लक्षात घेतलं पाहिजे कि प्रत्येक माणूस वेगळा असतो. आपली स्वतः ची बलस्थाने (strengths) वेगळी असतात. जे दुसऱ्यांकडे नसतात.
ह्यासाठी उपाय म्हणजे आपण जसे आणि  ज्या स्थितीत आहोत त्या बद्दल स्वतःची स्तुती करण.
  
६) दुसऱ्यांनी तुमच्या बद्दल आखलेल्या मर्यादांबद्दल विचार करण थांबवलं पाहिजे.

तुम्ही कितीही यश मिळवलं तरी असे काही लोकं असतात कि जे तुम्हाला सांगतात कि तुम्ही जे करत आहात ते अशक्य आहे.अशावेळी त्यांना दुर्लक्ष करण बर. जे तुम्हाला योग्य वाटत तेच करा. जेंव्हा कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवत नाही किंवा असं सांगतात कि हे तुम्हाला जमणार नाही तेंव्हा त्यांना इग्नोर करून आपलं काम करत राहाणचं योग्य.

७) सगळ्यांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत ह्यावर विचार करण थांबवलं पाहिजे.

बरेच वेळा आपण मोठ काम हातात घेताना अगदी आपल्या जवळचे लोकं आपल्याला सल्ले देतात. ते सल्ले देतात कारण त्यांना आपली काळजी असते. पण ते यामध्ये आपलं स्वप्न किती मोठ आहे हे नाही बघत. अशा वेळी त्यांना पटवून दिले पाहिजे कि जोखीम असली तरीही त्यापेक्षा फायदा कसा होणार आहे.
यावर मला Steve Jobs जे सांगतात ते लिहावसं वाटेल:
“Your time is limited, so don’t waste it living someone else’s life.  Don’t be trapped by dogma, which is living with the results of other people’s thinking.  Don’t let the noise of others’ opinions drown out your own inner voice, heart and intuition. Everything else is secondary.”


८) सतत भूतकाळातील चुकांवर विचार करण किंवा भविष्याची काळजी करत राहणे बदलले पाहिजे.

आपण सतत एकतर भूतकाळात जगतो किंवा भविष्याची काळजी करतो. भूतकाळ होऊन गेला आहे. तो बदलता येणार नाही. आणि भविष्य आजच्या कृतीवर अवलंबून आहे त्यामुळे आजचे काम योग्य आणि चोख पार पडणे महत्वाचे आहे.

९) इतरांनी तुमच्या बद्दल बनवलेलं मत विचारात घेणं थांबवले पाहिजे.

इतर लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं आणि ते तुच्याबद्दल काय बोलतात हे फारसं म्हत्वाच नाहीये. महत्वाचं हे आहे कि आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतंय.

१०) आपण कसे दिसतोय यावर विचार करण थांबवलं पाहिजे.

जसं आपल्याला आवडत आणि ज्यामध्ये आपण comfortable फील करतो तसं आपण राहिलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि त्याची आवड निवड वेगळी असते. कोणासारखा दिसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला जे आवडत तसच राहिले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा