मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१३

"तिने" केलेल्या उत्तम कामगिरीसाठी ........... उंच माझा झोका अवार्डचा कार्यक्रम

गेल्या रविवारी म्हणजे २५.०८.२०१३ ला झी मराठी वाहिनीवर  उंच माझा झोका अवार्डचा कार्यक्रम  लागला होता. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्या सर्व महिलांचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते आणि त्या सर्वजणींचा अभिमान वाटतो.

वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महत्वाची आणि उत्तुंग कामगिरी केलेल्या महिला आणि त्यांचे विचार या कार्यक्रमामुळे बघायला मिळाले.  त्या सर्व आज पोहोचलेल्या जागी , पोहोचण्यासाठी किती कष्ट आणि संकटे त्यांनी सहन केली आहेत हे समजले ......आणि एक पटल कि मेहनत आणि स्वतःवर विश्वास असेल तर आपण ठरवलं तर कुठेही जाऊ शकतो, हवं असलेलं साध्य करू शकतो ........ खूप सकारात्मकता दिली या कार्यक्रमाने.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा