बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३

मी पाहिलेली दहीहंडी तेंव्हा आणि आता ...............

लहानपणी मला दहीहंडी बघायची फार उत्सुकता असायची. आमच्या गल्लीमध्ये आमच्या बिल्डींगच्या जवळच दहीहंडी असायची. आम्ही मैत्रिणी बिल्डींगच्या गेट च्या आतून ती बघायचो.किती तरी वेळ उभं राहायचो दहीहंडी बघण्यासाठी, गाणी मोठ्याने लावलेली असायची तिथे आणि वाद्ये  पण वाजायची. आता पण हे सगळं होतं, पण ती मजा आणि ती उत्सुकताच निघून गेली आहे. नक्की कळत नाही कि सणांचे स्वरूप बदलते आहे कि आपल्यात बदल होतोय ......... आणि या मागे तशी ठोस कारणेही आहेत. 


(Image Source : my blog and link to images http://hobbyofphotography.blogspot.in/2013/08/dahihandi.html )



आमच्या नगरात जिथे पहिल्यांदी फक्त एकच दहीहंडी होती तिथे या वेळी अगदी थोडं (अर्ध्या kilometer पेक्षाही कमी) अंतर सोडून आणि रांगेत दिसतील अशा चार वेगवेगळ्या पक्षांच्या चार वेगळ्या दहीहंडी होत्या.(दरवर्षी एक प्रमाणे दहीहंडीच्या संख्येत वाढ झाली आहे.) मोठ्याने गाणी (बरीचशी अर्थ नसलेली गाणी) आणि वाद्ये पण होतीच. सकाळपासून जवळची सगळी दुकाने बंद होती. 

माझ्यात झालेला बदल-  लहानपणी बऱ्याच गोष्टी कळत नव्हत्या आणि त्यामुळे मजा यायची ........ त्या म्हणजे कि ह्यात बरेच गोविंदा जखमी होतात आणि काही अप्रिय घटनादेखील होतात . वाहतुकीची प्रचंड गैरसोय होते. आणि आवाजाचे (ध्वनी) प्रदूषण होते ते वेगळेच.

मला जाणवलेला  सणाच्या  स्वरूपातला बदल म्हणजे असा कि आता हा सण कमी आणि इवहेण्त (event) जास्त झालाय.  जागोजागी जाहिरातींचे फलक, वाढणारी बक्षिसांची रक्कम आणि प्रमुख पाहुणे यासाठीचे पैसे कसे येतात हे माहित नाही. पण बक्षिसाची रक्कम लाखांमध्ये असते. सणाचे मूळ स्वरूप राहिले बाजूला, दहीहंडी का केली जाते हे याचा विचार नाही पण किती थरांची होते आहे त्याकडे लक्ष असते. रेकॉर्ड तोडणार कि नाही याकडे लक्ष असते. प्रचंड स्पर्धा आणि तणाव हे सणात पण जाणवते. नऊ काय दहा थरांची हंडी पण आता कमीच आहे असे वाटावे अशा प्रकारचे ऐकायला मिळते. कुठे तरी असे वाटते कि माणुसकीची व्याख्या पण बदलते आहे.

असो, हे माझे विचार आहेत, आताच्या सणाच्या स्वरूपावर ......... त्यामुळे मी  (आम्ही) आता दहीहंडी बघायला जात नाही. पण दरवेळी मला लहानपणीच्या आठवणीत हरवायला होते. आणि तेंव्हाची उत्सुकता आणि आनंद आठवून आजही आनंदी ह्वायायला होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा